मा, उपाध्यक्ष / सदस्य खडकी छावणी परिषद,पुणे.
उपाध्यक्ष,पुणे शहर-जिल्हा काँग्रेस कमिटी

पक्षाची ध्येय, धोरणे निष्ठेनी जनतेपर्यंत घेऊन जाण्याकरिता प्रत्यक्ष पायाभूत सेवा-सुविधा विकास कामांचा परिचय 

माझा संक्षिप्त परिचय

नाव : श्री.मनिष सुरेंद्र आनंद
पत्ता : बंगला नं.३४, अर्जुन मार्ग, स्टेट बैंक ऑफ इंडिया समोर, खडकी, पुणे – ४११००३

शिक्षण : एस.एस.सी.

कौटुंबिक पार्श्वभूमी :  स्वत: व्यवसाय व शेती

पत्नी : मा.सदस्या, खडकी छावणी परिषद

जातः हिंदू पंजाबी (ओ.बी.सी.)

मनोगत

निवडणूक हे आपला सक्षम लोकप्रतिनिधी निवडण्याचे एक माध्यम आहे. लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करणारा, समाजजीवन समृद्ध करणारा, नागरिकांच्या अडीअडचणीची जाण आणि सामाजिक भान ठेवून विकासकामे करणाऱ्या लोकप्रतिनिधीची निवड जनता मतदानाच्या माध्यमातून करत असते. या लोकभावनेचा आदर राखूनच मी छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे. जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी, मतदार संघाचे प्रश्न विधानसभेत मांडण्यासाठी तुमच्या हक्काचा माणूस म्हणून मी सदैव कटिबद्ध राहीन.
समाजविकासाचे स्वप्न पाहणे, ते स्वप्न पूर्ण होण्यासाठी सत्तेत येणे, सत्तेत येण्यासाठी निवडणुका लढविणे, त्या जिंकण्यासाठी आपला विचार लोकांना पटवून देणे गरजेचे असते. माझे विचार आणि आजवर मी केलेले काम या पुस्तकाच्या रूपाने आपल्यापुढे ठेवत आहे. विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. काळानुरूप बदलणाऱ्या गरजा ओळखून कामे करावी लागतात. तरच तो विकास लोकाभिमुख होतो. गेल्या दहा वर्षात आपल्या मतदारसंघ विकासाच्या बाबतीत दहा वर्षे मागे गेला आहे. स्मार्ट सिटीचे गाजर दाखवून सत्ताधाऱ्यांनी जनतेच्या डोळ्यात धूळफेक केली आहे. ना चांगले रस्ते, ना आरोग्याच्या सुविधा, ना पुरेसे पिण्याचे पाणी… गेल्या दहा वर्षात जनतेला मूलभूत सोयीसुविधा देखील मिळू शकल्या नाहीत. वाहतूककोंडी, कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. महागाई गगनाला भिडली आहे. सर्वसामान्य जनतेचं जगणं मुश्कील झालं आहे. ही परिस्थिती बदलण्याची आणि आपल्या मतदार संघाच्या विकासाचं स्वप्न साकार करण्याची हीच वेळ आहे. आपलं एक मत आपलं, आपल्या कुटुंबाचं आणि आपल्या मतदारसंघाचं भविष्य घडवू शकतं आणि आपला एक चुकीचा निर्णय आपलं भविष्य बिघडवू देखील शकतं. ज्यांच्या हातात तुम्ही मोठ्या विश्वासानं सत्ता दिली, ज्यांनी जनतेला वाऱ्यावर सोडलं, त्या अकार्यक्षम उमेदवाराला निवडून द्यायचे की, आपल्या मदतीला धावणारा, आपल्या हक्काचा उमेदवार निवडायचा, हे आता तुम्हाला ठरवावं लागेल. लक्षात ठेवा ही संधी पाच वर्षातून एकदा मिळते.
गेली दहा वर्षे आपण सगळेच अनेक समस्यांचा सामना करत जगतोय. ही परिस्थिती बदलण्यासाठी, विकासकामांचा अनुशेष भरून काढण्यासाठी, आपल्या मुलांच्या उज्वल भविष्यासाठी मी ही निवडणूक लढवित आहे. लढण्याची ताकद आहेच, गरज आहे ती आपल्या साथीची आणि आशीर्वादाची.

श्री.मनिष सुरेंद्र आनंद

सामाजिक/राजकीय पदे

  • उपाध्यक्षः खडकी छावणी परिषद (२००८- २०१५) 
  • सदस्यः खडकी छावणी परिषद (२००८-२०२१) 
  • उपाध्यक्षः पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी
  • उपाध्यक्षः हॉकी महाराष्ट्र (जनरल सेक्रेटरी) 
  • उपाध्यक्षः महाराष्ट्र प्रदेश शूटिंग बॉल असोसिएशन
  • निरीक्षक : झारखंड विधानसभा निवडणूक, रांची जिल्हा

प्रशासकीय पदाचा अनुभवः

  • खडकी छावणी परिषदः सदस्य १२ वर्षे
  • खडकी छावणी परिषद उपाध्यक्ष ०६ वर्षे

सेवा हाच धर्म

Manish S Anand (1)

कार्य अहवाल